आरोग्यसेविकांची कामगार आयुक्त कार्यालयावर धडक

 Bandra
आरोग्यसेविकांची कामगार आयुक्त कार्यालयावर धडक

किमान वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्यसेविकांनी गुरुवारी धरणे आंदोलन केले. वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. 186 आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या तब्बल 4 हजार महिला आरोग्यसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


काय आहेत मागण्या?

किमान वेतन 12 हजार रुपये द्या

प्रसुती रजा मिळावी

पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड मिळावा


आरोग्य सेविकांना किमान वेतन देण्याचा निर्णय 20 जुलैला घेण्यात येणार आहे. कामगार आयुक्त केजुरे यांच्याबरोबर परिचारिकांच्या मागण्यांविषयी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत परिचारिकांच्या मागणीविषयी निर्णय घेण्यात आला. कायद्याप्रमाणे प्रसुती रजा आणि इतर फायदे न दिल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना किमान वेतन 5 हजार रुपये देण्यात येत होते. आता त्यांना किमान वेतन 12 हजार रुपये देण्यात येणार आहे.


घराघरांत जाऊन (एबेट) रसायन टाकण्याचे काम आरोग्यसेविकांचे नाही. रोगराई पसरल्यास आरोग्य केंद्राच्या स्टाफला मदत करणे एवढेच काम राहील. सुनावणी चालू असताना आरोग्य सेविकांना एक दिवसाचा ब्रेक देऊ नये.

- प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

महापालिकेकडून या परिचारिकांना घराघरात केमिकल्स टाकण्याचे कामही दिले जात होते. या कामासाठी महापालिकेचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तरीही या आरोग्यसेविकांना हे काम महापालिकेकडून देण्यात येत होते. ज्यामुळे या आरोग्यसेविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता हे काम या आरोग्यसेविकांना करण्याची गरज नसल्याचे प्रकाश देवदास यांनी स्पष्ट केले आहे.हे देखील वाचा - 

आरोग्य सेविकांचा जीव धोक्यातडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments