Advertisement

पालिकेच्या भूमिगत तलावांच्या योजनेचा प्रारंभ लवकरच

प्रशासनानं पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी मुंबई शहरात शिरू नये यासाठी ही योजना आखली आहे.

पालिकेच्या भूमिगत तलावांच्या योजनेचा प्रारंभ लवकरच
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)च्या २०२०च्या भूमिगत तलावांमध्ये अतिरिक्त पावसाचे पाणी साठवण्याच्या योजनेसाठी नेदरलँड्स, जपान आणि दक्षिण कोरियामधील कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. प्रशासनानं पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी मुंबई शहरात शिरू नये यासाठी ही योजना आखली आहे.

भूगर्भातील पाण्याचा निचरा (एसडब्ल्यूडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भूमिगत तलावाच्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. यात वरील देशांतील कंपन्या इच्छुक आहेत.

“मुसळधार पावसा दरम्यान शहरातील पूर आणि इतर ठिकाणांची माहिती आम्ही या कंपन्यांसह सामायिक केली आहे. आम्ही पात्रतेसाठी त्यांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करीत आहोत. सर्व योजना आखल्यास शहरभर भूमिगत पाण्याच्या टाक्या तयार होण्यास सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे एसडब्ल्यूडी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द इंडियन एक्स्प्रेसद्वारे सांगितलं.


नेमणूक झाल्यावर सल्लागारांना शहरातील खडकाळ आणि नाल्यांची तपासणी करताना खडक आणि मातीच्या स्वरूपासह भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल.

पालिकेनं म्हटलं आहे की, यासाठी ३४ कोटी खर्च येईल. सन २०२० मध्ये, महापालिकेचे सध्याचे माजी नगरपालिका आयुक्त, प्रवीण परदेशी यांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमिगत बोगद्याच्या बांधकामाला दिरवा कंदिल दाखवला होता.हेही वाचा

स्विमिंग पूल, चित्रपटगृहांबाबत केंद्र सरकारकडून नवी नियमावली

घाटकोपरमधील जुने मंदिर वाचवण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा