Advertisement

स्विमिंग पूल, चित्रपटगृहांबाबत केंद्र सरकारकडून नवी नियमावली

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता केंद्र सरकारने पुन्हा नव्या नियमावली जाहीर केली आहे.

स्विमिंग पूल, चित्रपटगृहांबाबत केंद्र सरकारकडून नवी नियमावली
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता केंद्र सरकारने पुन्हा नव्या नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, आता चित्रपटगृह आणि स्विमींग पूल अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत.१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीसाठी हा आदेश लागू असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे.  यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जुन्या गाईडलाईन्सचे इतर नियमदेखील पाळावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

याआधी चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजकीय आणि धार्मिक आंदोलनांना परवानगी देण्याबाबतची जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली आहे.  सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल. 

देशातील प्रवासाबाबतचे अनेक निर्बंधही नव्या एसओपीत हटवण्यात आले आहेत. राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. तसेच आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.



हेही वाचा -

खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा