Advertisement

घाटकोपरमधील जुने मंदिर वाचवण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन

शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात रहिवाशांनी मंदिर वाचवण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे.

घाटकोपरमधील जुने मंदिर वाचवण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं घाटकोपर आणि विद्याविहारला जोडणाऱ्या पूलाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे घाटकोप हून विद्याविहारला जाणं सोपं होणार आहे. पण या पूलामुळे घाटकोपर स्टेशनला लागून असणारे मारी आईचे जुने मंदिर दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. पण शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात रहिवाशांनी मंदिर वाचवण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे.

विद्याविहार पश्चिम तिकिट बुकिंग कार्यालयाजवळील हे मंदिर विद्याविहारच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भाग जोडणार्‍या आरओबीच्या मार्गानं येत आहे.

मारी आई ही घाटकोपरची कुलदेवी आहे, जशी मुंबादेवी आहे. मारी आईच्या आशीर्वादामुळे घाटकोपरनं खूप प्रगती केली आहे, असा समज आहे. पाच फूट बाय तीन फूट इतके हे मंदिर लहान आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सेनेचे नियंत्रण पालिकेवर आहे. परंतु रहिवाशांना मदत करण्यासाठी कोणताही वरिष्ठ नेता पुढे आला नाही. घाटकोपर इथल्या रहिवाशांना गरज भासल्यास ते म्हणाले की, मंदिर वाचवण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी रहिवासी रास्ता रोको आंदोलन करतील.

मंदिर वाचवण्यासाठी एन वॉर्ड आणि मध्य रेल्वेचे सहाय्यक आयुक्तांना पत्रही पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

तथापि, पालिका अभियंत्यांनी म्हटलं आहे की, ते मंदिर दुसर्‍या ठिकाणी हलवू शकतात. परंतु पुलाचे बांधकाम थांबणार नाही. माजी मंत्री आणि भाजप नेते प्रकाश मेहता म्हणाले, मंदिर वाचवण्यासाठी सर्व पक्षांचे सदस्य पुढे आले आहेत आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.हेही वाचा

मे महिनाअखेर मेट्रो २ ए, मेट्रो ७ सुरू

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी, कॅगकडून १० हजार पदांसाठी जाहिरात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा