Advertisement

जुहू चौपाटीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले

कौस्तुभ गणेश गुप्ता, प्रथम गणेश गुप्ता हे दोघे भाऊ, अमन सिंह आणि अभिषेक शर्मा असे चौघे जण जुहू चौपाटी येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले होते.

जुहू चौपाटीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले
(File Image)
SHARES

जुहू चौपाटी इथल्या समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने मंगळवारी तिघे जण बुडाले होते. त्या तिघांचेही मृतदेह बुधवारी शोध मोहिमेदरम्यान सापडले. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. हे तिघे चेंबूर वाशीनाका येथील अमन सोसायटी इथं हे राहत होते.

या दुर्घटनेत कौस्तुभ गुप्ता (१८) व प्रथम गुप्ता (१६) या दोघा सख्ख्या भावांसह अमन सिंह (२१) अशा तिघांचा मृत्यू झाल्याचे कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. अभिषेक शर्मा (१८) हा या दुर्घटनेत बचावला होता.

कौस्तुभ गणेश गुप्ता, प्रथम गणेश गुप्ता हे दोघे भाऊ, अमन सिंह आणि अभिषेक शर्मा असे चौघे जण जुहू चौपाटी येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले होते.

त्यावेळी तेथे उपस्थित जीवरक्षकाने त्यांना समुद्रात खोल पाण्यात जाण्यास मनाई केल्याचे समजते. मात्र हे चौघे जण लाइफगार्डची नजर चुकवून समुद्रात पोहायला गेले. समुद्रात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघे जण समुद्रात बुडाले. अभिषेक शर्मा याला जीवरक्षकाने वाचवले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी त्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली होती. जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी बुडल्याची माहिती दिली होती.

"चेंबूर इथले चार मित्र जुहू समुद्रकिनारी खेळण्यासाठी आले होते. पोहणे माहीत नसतानाही तिघे समुद्रात गेले. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ते आत खेचले गेले. घटनेच्या वेळी समुद्राची भरतीओहोटी होती पण लाटांनी त्यांना आत ओढले,” अशी माहिती सांताक्रूझ पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिली.

मंगळवारी दुपारी 3:30 च्या सुमारास ही घटना घडली आणि 4:45 च्या सुमारास जीवरक्षकांनी याची माहिती दिली.

सांताक्रूझ (प.) येथील जुहू तारा रोड येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या मागे ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकानं दोन दिवस ही शोध मोहीम सुरू ठेवली होती. त्यांच्यासोबत नौदलाचे गोताखोर देखील तिघांचा शोध घेत होते.



हेही वाचा

16 जून रोजी मुंबईत सर्वात मोठी भरती

चिंतादायक! ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळला महाराष्ट्रात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा