Advertisement

डीजेवरील बंदी कायम!

डीजेची किमान पातळीच ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि डाॅल्बीला परवानगी देणं शक्य नसल्याचा दावा करत राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला.

डीजेवरील बंदी कायम!
SHARES

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी डीजे तसंच डाॅल्बी सिस्टिम वाजवण्यावरील बंदी उठवण्यात यावी ही याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत डीजेवरील बंदी कायम ठेवली आहे.


कुणाची याचिका?

'प्रोफेशनल आॅडियो आणि लायटनिंग असोसिएशन'(पाला) या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचं उल्लंघन न करता डीजे आणि डाॅल्बी सिस्टिम वाजवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


सरकारचा विरोध

न्या. शंतनू केमकर आणि न्या. के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीत डीजेची किमान पातळीच ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि डाॅल्बीला परवानगी देणं शक्य नसल्याचा दावा करत राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला.


७५ टक्के खटले डीजेचे

डीजे सुरू केल्यावरच ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडली जाते. गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास पोलिस संबंधितांवर केवळ कारवाई करू शकतात. परंतु संपूर्ण गणेशोत्सवातील डीजे वाजवणं रोखू शकत नाही. वर्षभरात ध्वनी प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या खटल्यांमध्ये ७५ टक्के खटले डीजेचे आहेत, अशी माहितीही राज्य सरकारने न्यायालयात दिली.

त्यावर न्यायालयाने डीजे आणि डाॅल्बी सिस्टिमवरील बंदी यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय दिला.



हेही वाचा-

ध्वनीप्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळांवर गुन्हे दाखल

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाहीच! - हायकोर्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा