Advertisement

ध्वनीप्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळांवर गुन्हे दाखल


ध्वनीप्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळांवर गुन्हे दाखल
SHARES

यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वा तत्सम कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या वाद्यांचा वापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. ध्वनीप्रदूषण करणाऱ्या या वाद्यांवर उच्च न्यायालयानं बंदी कायम ठेवली असून नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली.


ध्वनीप्रदूषण नको

डीजे वा तत्सम वाद्यांचा आवाज किमान १०० डेसिबलपर्यंत जातो. त्यामुळेच कमालीचं ध्वनीप्रदूषण करणाऱ्या या वाद्यांना गणपती विसर्जनाची मिरवणूक वा अन्य उत्सवांत परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बुधवारी उच्च न्यायालयात घेतली. तसंच नियमांचे उल्लनघंन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले.


१०३ मंडळांवर कारवाईचा बडगा

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पहिल्या दिवसांपासून लाऊडस्पीकर आणि डीजेचा वापर करणाऱ्या आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंनघन करणाऱ्या १०३ मंडळांवर कारवाई केली अाहे. तसंच रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कायद्याचे उल्लंघंन होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

गणेशोत्सवाच्या गर्दीत चार दिवसात १३५ मोबाइल चोरीला

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद; ४२९ पिशव्या जप्त



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा