SHARE

भिवंडीतल्या नवीबस्ती भागातील केजीएन चौक येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास चार मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. सध्या घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू केले आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. 


या दुर्घटनेत याकुब खान (१९) नावाच्या मुलीसह आणखी दोघांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी भेंडीबाजार आणि घाटकोपरमध्येही जुनी इमारत कोसळल्याने अनेकांनी जीव गमावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भिवंडतीही अशीच घटना घडली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या