Advertisement

राणीच्या बागेत १४ वर्षांनी घुमणार वाघाची डरकाळी


राणीच्या बागेत १४ वर्षांनी घुमणार वाघाची डरकाळी
SHARES

भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) येणाऱ्या पर्यटकांना आता वाघांचं दर्शन घडणार आहे. औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानातून करिष्मा (मादी) आणि शक्ती (नर) हे दोन पट्टेरी वाघ इथं आणण्यात आले आहेत. लवकरच हे वाघ पर्यटकांना जवळून पाहता येणार आहेत. दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर त्यांना भायखाळातल्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलं


१४ वर्षांनी वाघोबाची डरकाळी

पेंग्विन आणि विविधरंगी पक्षी तसेच नवनवीन प्राण्यांची गजबजाट असणाऱ्या राणीच्या बागेत तब्बल १४ वर्षांनी वाघोबाची डरकाळी कानी पडणार आहे. दोन वाघांची जोडी बुधवारी जिजामाता उद्यानात दाखल झाली. शक्ती हा चार वर्षांचा तर करिष्मा ही सहा वर्षांची आहे.


लवकरच वाघाचं दर्शन

वाघांच्या या जोडीच्‍या बदल्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून दोन जोडी ‘चितळ’ आणि दोन जोड्या ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत. औरंगाबाद इथून आणण्यात आलेल्या करिष्मा आणि शक्ती या वाघांना प्राणिसंग्रहालयाच्या क्‍वारंटाइन सुविधेमध्ये ठेवण्यात आलं आहे. लवकरच या वाघांना जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल.


खड्डे बुजवण्यासाठी पालिका वापरणार नवे तंत्रज्ञान२००६ साली होते उद्यानात वाघ

राणीच्या बागेत २००६ पूर्वी पट्टेरी वाघाची जोडी होती. त्यापैकी मादी २००४ मध्ये तर नर २००६ मध्ये मरण पावला. त्याच सुमारास एका स्वयंसेवी संस्थेनं राणीच्या बागेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास केले जात नाहीत तोपर्यंत उद्यानात प्राणी ठेवण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश न्यायालयानं दिले होते. पण पुन्हा राणी बागेत वाघ पाहायला मिळणार आहेत. 


पट्टेरी वाघाची प्रजाती धोक्यात

  • भारताचा राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या पट्टेरी वाघास ‘आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ’ यांच्याद्वारे धोक्यात आलेली     प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

  • सिद्धार्थ उद्यानात १३ वाघ आहेत. त्यापैकी दोन वाघ राणीच्या बागेला देण्यात आले आहेत. या जोडीतील ‘शक्ती’चा जन्म नोव्हेंबर २०१६ मध्ये, तर ‘करिष्मा’चा जन्म जुलै २०१४ मध्ये झाला आहे.
  • पट्टेरी प्रजातीचे वाघ हे जंगलात सांबरासारख्या मोठय़ा हरिण प्रजातींची शिकार करतात; परंतु लहान हरिण प्रजाती आणि मासे यावरदेखील ते जगू शकतात.
  • वाघांच्या संवर्धनामुळे शाकाहारी प्राण्यांच्या अनियमित  लोकसंख्येवर नियंत्रण होते. यामुळे पर्यावरणातील इतर जैविक     घटकांचं देखील संवर्धन होतं.हेही वाचा

मेट्रोसाठी पुन्हा झाडं कापली जाणार, सरकारची भूमिका काय?

सायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा