Advertisement

कर्नाक पूल लवकरच वाहतुकीसाठी बंद


कर्नाक पूल लवकरच वाहतुकीसाठी बंद
SHARES

रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याणच्या पत्री पुलाचं पाडकाम यशस्वीरित्या पार पाडलं. त्यानंतर, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद येथील कर्नाक बंदर पूल पाडण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेनं याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून हा पूल जुना झाल्यानं पाडण्यात यावा, अशी सूचना केली. त्यानुसार मध्य रेल्वे, मुंबई आयआयटी आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी या पूलाचा आढावा घेतला. यामध्ये रेल्वे मार्गावरून गेलेल्या पुलाचा भाग पाडणं अनिवार्य असल्यानं हा पूल पाडण्यात येणार आहे.


जड वाहनांना बंदी 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद येथील कर्नाक बंदर पूल जुना झाला आहे. या पुलावरून जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून फक्त हलक्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु, मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेला हा पूल पाडण्याबाबत सूचना केल्यानंतर याची संयुक्त पद्धतीने चाचपणी घेतल्यानंतर हा पूल पाडण्यावर एकमत झालं आहे. त्यामुळे आता या पुलावरील हलक्या वाहनांची वाहतूकही बंद केली जाणार आहे. याबाबत मध्य रेल्वेकडून संमती मिळताच पुढील प्रक्रिया हाती घेतील जाणार आहे.


पर्यायी मार्ग द्या

दोन वर्षांपूर्वी १३५ वर्षे जुना हँकॉक पूल पाडण्यात आला. परंतू, हँकॉक पूलाच्या पाडकामवेळी अन्य पुलाचा पर्याय न दिल्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळं कर्नाक पूल पाडण्यापूर्वी प्रवाशांच्या दृष्टीनं पर्यायी मार्ग द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा