Advertisement

बीडीडी चाळीत वाहून आले 'कॅट फिश'


बीडीडी चाळीत वाहून आले 'कॅट फिश'
SHARES

मंगळवारी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मुंबईकर आपापल्या परीने प्रयत्न करत असताना 'कॅट फिश' नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोड्या पाण्यातील माशांनीही आपला जीव वाचवण्यासाठी मोठ्या डबक्यातून थेट वरळीतील गटारांकडे मोर्चा वळवला. बीडीडी चाळ परिसरातील इमारत क्रमांक ११० शेजारील गटारात या 'कॅट फिश' आढळून आले. हे मासे पाहण्यासाठी रहिवाशांची एकच झुंबड उडाली होती.

वरळीत मंगळवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यातच समुद्राला देखील भरती आल्याने ड्रेनेज लाईनही ओव्हरफ्लो झाली. परिणामी, हे 'कॅट फिश' गटारातून बाहेर पडले. सायंकाळच्या वेळेस एकाचवेळी शेकडोच्या संख्येने हे 'कॅट फिश' गटारातून बाहेर आल्याने बीडीडी चाळीतील रहिवासीही आश्चर्यचकीत झाले होते.




जोरदार पाऊस, समुद्राला आलेली भरती यामुळे ड्रेनेज लाईन भरून वाहू लागल्याने हे मासे गटारात आले आणि गटारातही जास्त पाणी साचल्याने हे मासे बाहेर रस्त्यावरील पाण्यात आले.
- ऋषी अग्रवाल, पर्यावरण अभ्यासक


काही रहिवासी तर पुढे येऊन हे मासे पकडू लागले. बीडीडीतील बऱ्याच रहिवाशांनी प्रत्येकी ८ ते १० मासे पकडून घरी नेले. शिवाय हे मासे पाहण्यासाठी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.


'कॅट फिश' अस्वच्छ पाण्यात किंवा गटारात आढळून येतात. क्वचितच हे मासे कोळ्यांच्या जाळ्यात सापडतात. हे मासे खाण्यायोग्य नसतात. मानेवर पट्टा असेल तर तो मासा विषारी असतो. त्याच्या खांद्याजवळ एक ठिपका देखील असतो. मंगळवारच्या पावसात गटारातून बाहेर पडणारे हे मासे गोड्या पाण्यातील असावेत.
- डॉ. विनय देशमुख, मत्स्य अभ्यासक



हे देखील वाचा -

वरळीत पडला सगळ्यात जास्त पाऊस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा