Advertisement

ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

२२ जानेवारीच्या संध्याकाळी, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आगीच्या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले.

ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
SHARES

ग्रॅन्टरोड इथल्या ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीचा अहवाल चौकशी समितीनं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात आग नक्की कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट नाही.

तपासानंतर समोर आलं आहे की, २० मजली इमारतीच्या अनेक मजल्यांवर टीव्ही आणि इंटरनेट वायर जोडलेले होते. पण त्या वायरी उघड्या ठेवल्या होत्या. ज्यामुळे आग वेगानं पसरली.

२२ जानेवारीच्या संध्याकाळी, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आगीच्या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशी समितीचा अहवाल गेल्या आठवड्यात गुरुवारी महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला होता. बुधवारी तो सार्वजनिक करण्यात आला.

मुंबई अग्निशमन दलात (एमएफबी) एक विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा, जो फॉर्म-बी सबमिशनचा प्रभारी असेल आणि उंच इमारतींमध्ये द्वि-वार्षिक फायर ऑडिट केले जाते की नाही हे तपासेल, असे अहवालात सुचवण्यात आले आहे.

शहरात असलेल्या सर्व १४४३ उंच इमारतींनी अद्ययावत फॉर्म-बी सादर केला आहे की नाही हे अग्निशमन दलानं तपासले पाहिजे. ज्या इमारतींनी त्यांचे फायर ऑडिट केले नाही त्यांना नोटिस पाठवाव्यात असं सुचवले.

प्रत्येक आस्थापनाला बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये समाविष्ट असलेल्या तृतीय-पक्ष लेखा परीक्षकांच्या हस्ते द्वि-वार्षिक फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे आणि त्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल (फॉर्म-बी) मुंबई अग्निशमन दलाला सादर करणे अपेक्षित आहे.

अहवालानं मुंबई अग्निशमन दलाच्या निष्कर्षांना दुजोरा दिला आहे. अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इमारतीतील रहिवाशांना जबाबदार धरले आहे. आग लागल्याच्या वेळी इमारतीची अंतर्गत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती, टेरेस बंद होते.

रहिवाशांनी आगीच्या वेळी त्यांचा वापर केला नाही. अहवालात असं म्हटलं आहे की, इमारतीच्या ८व्या मजल्यावरील रेफ्युज एरियामध्ये काही ज्वलनशील भंगार साहित्य साठवले होते, परंतु त्यामुळे आग लागली नाही.

शिवाय, लाकूड, लाकडी फर्निचर आणि भिंतींचे लाकडी फलक लावल्यामुळे फ्लॅट १९०४ मध्ये आग झपाट्यानं पसरली. तसंच स्वयंपाकघरातील भिंत काढून घराच्या अंतर्गत बदल करण्यात आले.

अहवालात असे सुचवण्यात आले आहे की, पालिकेनं केवळ उंच इमारतींमधील घरांवर असे काम करणार्‍या इंटिरिअर डेकोरेटर्स/डिझायनर्सची नोंदणी करण्यासाठी एक समिती स्थापन करावी आणि अशा नोंदणीकृत इंटिरिअर डेकोरेटर्स/डिझायनर्सच्या हस्ते घरांचे अंतर्गत काम करणे अनिवार्य करावे.

इमारतींनी भाड्यानं घेतलेल्या खाजगी सुरक्षा कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी प्राथमिक अग्निसुरक्षेबाबत शिक्षित असल्याची खात्री करावी, असंही अहवालात सुचवण्यात आले आहे.

काही मजल्यांवरील २ फ्लॅट्स एकत्र करून एक फ्लॅट बनवण्यात आल्यानं, मुख्य दरवाजाची स्थिती बदलण्यात आली, असं अहवालात नमूद करण्यात आले आहे. फ्लॅट १९०४ च्या बाबतीत, तपासणी कक्षाचा दरवाजा आणि मुख्य दरवाजा यांच्यातील अंतर २ फुटांपेक्षा कमी होते.

जोपर्यंत अग्निशमन दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नाही तोपर्यंत सचिनम हाइट्समधील रहिवाशांना इमारतीत पुन्हा कब्जा करण्याची परवानगी दिली जाणार नाही.



हेही वाचा

दुकानांवरील मराठी पाट्यांविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा