Advertisement

मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर, अनेक सीसीटीव्ही बंद

मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील अनेक सीसीटीव्ही बंद पडले आहेत. त्यामुळे पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर, अनेक सीसीटीव्ही बंद
SHARES

मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील अनेक सीसीटीव्ही बंद पडले आहेत. त्यामुळे पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. वेळीच वार्षिक देखभालीचा करार न केल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. आता तेथील ८४ सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची धावपळ सुरू झाली आहे. नवीन सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केला आहे. यासाठी मुंबई महापालिका ७७ लाख रुपये खर्च करणार आहे.

पालिका मुख्यालयात महापौर, आयुक्त, विविध समित्यांचे अध्यक्ष, पक्षांची कार्यालये असल्याने या इमारतीत अनेक बड्या नेत्यांची लोकांची ये-जा असते. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे मुख्यालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याची टीका नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. महापालिका  मुख्यालयात सुरक्षेच्या कारणासाठी २०१६ मध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. याचे कंत्राटही संपले आहे. यामुळे या सीसीटीव्हीची देखभाल करणे कंत्राटदाराने बंद केले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी नवा करारच करण्यात आलेला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही बंद पडले. आता नव्याने ८४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी कंत्राटदाराला नव्याने कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी ७७ लाख ५५  हजार ५१४ रुपये खर्च करणार आहे. 



हेही वाचा -

काशीमिरात ४ वर्षांच्या मुलीचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा