Advertisement

चोरांना पकडण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाचा वापर

मध्य रेल्वेच्या (Central Railway) घाटकोपर रेल्वे स्थानकात (Ghatkoper Station) लवकरच चेहऱ्याची ओळख पटवणारं तंत्रज्ञान (Technology) बसवण्यात येणार आहे.

चोरांना पकडण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाचा वापर
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा चोरीच्या (Thief) घटनांना सामोरं जावं लागतं. लोकलमध्ये (Local) मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असतात. या घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे पोलीस दलाकडून (Railway Police) अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, अद्याप तरिही या घटना कमी झालेल्या नाहीत. त्यामुळं आता चोरांना पकडण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

मध्य रेल्वेच्या (Central Railway) घाटकोपर रेल्वे स्थानकात (Ghatkoper Station) लवकरच चेहऱ्याची ओळख पटवणारं तंत्रज्ञान (Technology) बसवण्यात येणार आहे. त्यामुळं आता ऐन गर्दीत हरवलेली व्यक्ती किंवा एखादा मोस्ट वाँटेड आरोपीही पकडणं सहज शक्य होणार आहे. घाटकोपरसह नाशिक (Nashik) आणि मनमाड (Manmad) इथं प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या या यंत्रणेची चाचणी घेण्यात येत असून, प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा अत्यंत साधीसोपी असली तरी तिचा उपयोग प्रचंड मोठा आहे. चेहऱ्याची ओळख पटविणारी ही यंत्रणा रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, पूल आणि रेल्वे स्थानकाच्या (Railway Station) येण्या-जाण्याच्या मार्गावर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी जोडण्यात येणार आहे.

त्याशिवाय, कंट्रोल रुममधून संशयित आरोपी आणि हरवलेल्या व्यक्तिंचा डेटा या यंत्रणेत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा वेळी संबंधित व्यक्ती या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या (CCTV) परिप्रेक्ष्यात येताच त्याचा अॅलर्ट थेट कंट्रोल रुममध्ये (Control Room) जाणार आहे. त्यामुळं संबंधित व्यक्तिला ट्रेस करणं सोपं जाणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.

या तंत्रज्ञानाद्वारे स्टेशनवरील गर्दीचं व्यवस्थापनही केलं जाणार आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाल्यास त्याचाही अलार्म कंट्रोल रुमला येणार आहे. त्यामुळं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस पाठवले जाणार आहेत. हे तंत्रज्ञान या ३ स्थानकावर यशस्वी ठरल्यास इतर ठिकाणी सुद्धा ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचं समजतं.



हेही वाचा -

'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर

सारा अली खानचा डबल रोल, धनुष-अक्षयसोबत करणार रोमांस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा