केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमाली जारी करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के इतकीच ठेवण्यात यावी, उर्वरीत कर्मचाऱ्यांना work from home देण्यात यावं, असं नियमालीत केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मंगळवारपासून पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत.
याशिवाय रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.
दरम्यान, मुंबईत आज ८ हजार ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज २ मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, ६२२ जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ५१ हजार ३५८ वर पोहचलीय.
दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या २९ हजार ८२९ रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर १३८ दिवसांवर पोहचलाय. मुबंईत सध्या ३७ हजार २७४ रुग्ण सक्रीय आहेत.
गेल्या २४ तासांत देशात ३३ हजार ७५० कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर १२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ झाली आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ८४६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा