Advertisement

मुंबईत सोमवारी 'इतके' रुग्ण सापडले, ९०% रुग्णांना लक्षणं नाहीत

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय.

मुंबईत सोमवारी 'इतके' रुग्ण सापडले, ९०% रुग्णांना लक्षणं नाहीत
(Representational Image)
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. सोमवारी मुंबईत आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत आज ८ हजार ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज २ मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, ६२२ जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ५१ हजार ३५८ वर पोहचलीय.

दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या २९ हजार ८२९ रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर १३८ दिवसांवर पोहचलाय. मुबंईत सध्या ३७ हजार २७४ रुग्ण सक्रीय आहेत.

सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी एका विशेष मुलाखातीत दिलीय.

तसंच ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन आणि होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिकेनं देखील १ ते ९ च्या शाळा आणि ११ वीचे क्लासेस बंद करण्यात आल्याची माहिती दिली.हेही वाचा

मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळा, कॉलेजेस 'या' तारखेपर्यंत बंद

'या' ९ जम्बो केंद्रांमध्ये होणार लहान मुलांचे लसीकरण

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा