Advertisement

वास्तुशास्त्रानुसार मुंबई महापौर दालनात बदल

मुंबईच्या नव्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही वास्तुशास्त्रानुसार आपल्या दालनातील रचनेत बदल केले आहेत.

वास्तुशास्त्रानुसार मुंबई महापौर दालनात बदल
SHARES

नवीन घर घेतल्यानंतर घरात वास्तूशांती केली जाते. त्यानुसार घरातील दरवाजा कोणत्या दिशेला हवा?, स्वयंपाक घर कोणत्या दिशेला हवं?, देवारा कोणत्या दिशेला हवा? या सर्वाची पाहणी करून घराची रचना बदलतात. परंतु, आता मुंबईच्या नव्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही वास्तुशास्त्रानुसार आपल्या दालनातील रचनेत बदल केले आहेत. महापौरांनी आपल्या दालनाच्या जुन्या प्रवेशद्वारातून प्रवेश बंद करून बाजूच्या दरवाजाचा वापर सुरू केला आहे. दालनातील आसन व्यवस्थेतही बदल केले आहेत. वास्तूशास्त्रातील दोषामुळे हे बदल केल्याचं बोललं जात आहे.

हेरिटेज इमारत

महापालिकेच्या हेरिटेज इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर महापालिका सभागृहाला लागूनच महपौरांचं दालन आहे. पूर्वी या दालनाच्या शेजारी महापालिका चिटणीसांचंही दालन होतं. कालांतरांनं चिटणीसांना अन्य दालन उपलब्ध करून देत महापौरांचं दालन भव्य करण्यात आलं. मात्र, दालनातील २ दरवाजे जैसे थे ठेवण्यात आले. सन १९९९ मध्ये हरेश्वर पाटील महापौर असताना महापौरांची खुर्ची दालनात शिरल्यानंतर डाव्या हाताला होती. ही व्यवस्था पुढील काही काळ तशीच ठेवण्यात आली होती.

मुख्य दरवाजा बंद

श्रद्धा जाधव यांच्या महापौरपदाच्या काळात सन २००९मध्ये मुख्य दरवाजातून आत शिरल्यानंतर समोरच महापौरांची खुर्ची होती. विश्वनाथ महाडेश्वर महापौर होईपर्यंत ही आसन व्यवस्थाही तशीच होती. परंतु, किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती होताच त्यांनी खुर्ची व इतर आसनव्यवस्था बदलण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. सध्याचा दालनाचा मुख्य दरवाजा बंद करून त्याच्या बाजूचा दरवाजा उघडण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांचं आसन

त्यानुसार, आता विरुध्द दिशेला महापौरांचं आसन ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे दरवाजातून दालनात गेल्यानंतर डाव्या हाताला महापौरांकडे जावे लागते. या बदलामुळे दालनातील डाव्या बाजूला असलेले मिटींग टेबल उजव्या बाजूला ठेवण्यात आले आहे. अवघ्या आठवडाभरातच हा बदल केल्यामुळं चर्चेचा विषय ठरला आहे.



हेही वाचा -

मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये कांद्याची चोरी

'या' १२ मार्गांवर सुरू होणार वातानुकूलित मिनी बस सेवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा