Advertisement

मुंबईतील सस्मिरा संस्थेत मशीनमधून रासायनिक गळती, ४ जण गंभीर भाजले

मुंबईतील वरळी सस्मिरा संस्थेमधील मोठं वृत्त समोर येत आहे.

मुंबईतील सस्मिरा संस्थेत मशीनमधून रासायनिक गळती, ४ जण गंभीर भाजले
SHARES

मुंबईतील वरळी सस्मिरा संस्थेमधील मोठं वृत्त समोर येत आहे. वरळी सस्मिरा संस्थेच्या चाचणी विभागातील मशीनमधून रासायनिक गळती (ग्लिसरीन) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी सस्मिरा संस्थेच्या चाचणी विभागात मशीनमधून रासायनिक गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जण गंभीर भाजले आहे. जखमींमध्ये २ पुरूष आणि २ महिलांचा सामावेश आहे. जखमींना जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मात्र, चौघांना अधिक भाजल्यामुळे उपचारासाठी ऐरोली बर्न रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



हेही वाचा

गिरगाव चौपाटीचा एक भाग बंद, BMCचा मोठा निर्णय

लोकमान्य टिळक टर्मिनसवर 2 अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा