Advertisement

२ दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांसाठी जमले २० कोटी

अवघ्या २ दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २० कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती समोर येत आहे.

२ दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांसाठी जमले २० कोटी
SHARES

मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळं लाखो घरं उद्ध्वस्त झाली. त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या २ दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २० कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईसह राज्यभरातील विविध सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील घटक, व्यावसायिक, संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत प्रत्यक्ष जमा करणे किंवा पाठविणं सुरू केलं आहे


'यांनी' दिलं योगदान

  • सैफी फाऊंडेशनकडून एक कोटी रुपये.
  • सारस्वत बँकेच्या वतीने एक कोटी रुपये.
  • आकाश इन्स्टिट्यूटच्या वतीने ५१ लाख रुपये.
  • अलॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कडून ५० लाख रुपये.
  • इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून २५ लाख रुपये.
  • सदगुरू श्री. साखर कारखाना यांच्या वतीने २२ लाख रुपये.
  • लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून २५ लाख रुपये.
  • मर्सिडीज बेंझ कंपनीच्या वतीने २५ लाख रुपये आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वतीने तीन लाख ६० हजार रुपये.
  • खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून २५ लाख ५२ हजार ८५२ रुपये.
  • भारतीय जनता पार्टी, मुंबई उत्तर पश्चिम विभागाच्या कडून २१ लाख रुपये, बोरीवली मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने २५ लाख रुपये.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सतरा लाख ७२ हजार रुपये. 
  • आमदार मनिषा चौधरी यांच्या मतदार संघातील विविध संस्था संघटना आदींकडून १५ लाख, ४३ हजार रुपये. 
  • सुगी समुहाचे निशांत देशमुख यांच्याकडून ११ लाख रुपये.
  • महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून दहा लाख रुपये.
  • भाजपच्या उत्तर पुर्व विभागाकडून दहा लाख रुपये.
  • व्हॅल्यूएबल ग्रुपकडून दहा लाख रुपये.
  • संजय शिंदे यांच्याकडून ११ लाख रुपये. 
  • विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून १० लाख हजार रुपये.
  • श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे यांच्या वतीने सात लाख ७७ हजार रुपये तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत केले यांच्या वतीने लाख ११ हजार रुपये.
  • मुलुंडच्या प्रेरणा युवक ट्रस्टकडून ५ लाख रुपये.
  • एस नरेंद्रकुमार आणि कंपनीकडून ५ लाख रुपये.
  • फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडून ५ लाख रुपये .
  • एस. आर. भल्ला आदींकडून ५ लाख रुपये.
  • मराठवाडा लोकविकास मंचकडून ५ लाख रुपये.
  • खासदार कपिल पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये .
  • मुलुंड सेवा संघाकडून १ लाख २५ हजार रुपये. 
  • फ्युएल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये.
  • याच संस्थेचे मुख्य प्रवर्तक संतोष हुरलीकोप्पी यांच्याकडून अडीच लाख रुपये. 
  • आमदार भारती लव्हेकर यांच्या पुढाकारातून जमा करण्यात आलेले २ लाख ७१ हजार १०० रुपये.
  • शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये.
  • सेव्हिलीयर क्लिनिकल सप्लाईज सर्व्हिसेसकडून १ लाख ११ हजार रुपये. 
  • हेतल गाला यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये.
  • योगेश कटारिया यांच्याकडून १ लाख १ हजार रुपये.
  • सन्नी सानप यांच्याकडून १ लाख रुपये.
  • शकुंतला ठक्कर यांच्याकडून १ लाख रुपये.
  • बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून १ लाख रुपये.
  • खार दांड्यातील दांडा कोळी समाजाकडून १ लाख रुपये.



हेही वाचा -

महापौरांनी विनयभंग केलाच नाही, 'त्या' महिलेने केला खुलासा!

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा