Advertisement

बीएमसीकडून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा, विजेत्यांना ४ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके

पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’अंतर्गत महानगरपालिकेच्‍या हद्दीतील निवासी संकुल, मोहल्ला, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा, बाजार संघटना, शासकीय कार्यालये आदींची स्‍वच्‍छता तपासणी करून, विजेत्‍यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले जाणार आहे.

बीएमसीकडून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा, विजेत्यांना  ४ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके
SHARES

मुंबई महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’अंतर्गत महानगरपालिकेच्‍या हद्दीतील निवासी संकुल, मोहल्ला, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा, बाजार संघटना, शासकीय कार्यालये आदींची स्‍वच्‍छता तपासणी करून, विजेत्‍यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होण्यासाटी इच्‍छुकांना २७ नोव्‍हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. या स्पर्धेमध्ये विविध प्रवर्गात मिळून एकूण ४ लाख ५० हजार रुपयांची १३ पारितोषिके दिली जाणार आहेत.


केंद्र शासनाच्या गृह व नागरी मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत निकष आखून दिले आहेत. या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी होत आहे. त्याचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व २४ विभागांतील निवासी संकुल, मोहल्ला, महानगरपालिका तसेच शासकीय कर्मचारी निवासस्थान, रुग्णालये, बाजारपेठा (मार्केट असोसिएशन), हॉटेल्स, शाळा, आदींची स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी आधारे स्पर्धा घेतली जाणार आहे. यातील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.


ही स्वच्छता स्पर्धा घेण्यासाठी महानगरपालिकेने ‘मे. युनायटेड वे मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेची नेमणूक केली आहे. या स्पर्धेमध्‍ये  सहभागी होता यावे, यासाठी इच्‍छुकांचे अर्ज https://www.unitedwaymumbai.org/mcgmsurvekshan या संकेतस्थळावर २७ नोव्‍हेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तपशिलवार माहितीसह भरणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज असलेल्या स्पर्धकांचे अर्ज, त्यांना कोणतीही माहिती न देता फेटाळण्यात येतील.


यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग ३ आर तत्व आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावरील जिंगल, रेखांकने, भित्तीपत्रिका, चित्रफिती,‍ भित्तीचित्रे व पथनाट्ये यांचीदेखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये (१) जिंगल, (२) चित्रफित, (३) पोस्टर/रेखांकन, (४) भित्तीचित्र, ५) पथनाट्ये या पाच उपघटकांमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केली जातील.



हेही वाचा -

काशीमिरात ४ वर्षांच्या मुलीचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा