वडाळा परिसरात रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

 Mumbai Port Trust
वडाळा परिसरात रॅलीतून स्वच्छतेचा संदेश
Mumbai Port Trust  -  

पोर्ट ट्रस्ट - वडाळा - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वैद्यकीय चिकित्सा विभागाच्या वतीने वडाळा पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगार वसाहत आणि रुग्णालय परिसरात स्वच्छता जनजागृती रविवारी रॅली काढण्यात आली. यात कराटेचे प्रशिक्षण घेणाऱ्या इंडियन मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरच्या 100 मुलांनी सहभाग घेतला होता.

या वेळी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. अण्णादुराई, वरिष्ठ उप प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता मोकल, आरोग्य शिक्षणाधिकारी ऐलीस डिसिल्व्हा, स्वच्छता पर्यवेक्षक संजय धुमाळ, कराटे प्रशिक्षक अजय शहा आदी रॅलीत सहभागी झाले होते.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वैद्यकीय चिकित्सा विभागाच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यात स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येतो. यंदाही 31 मार्चपर्यंत स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. यात स्वच्छता राखा रोगराई टाळा, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशवी खरेदी करा, शिळे अन्न खिडकीतून बाहेर टाकू नका, आठवड्यातून एक दिवस परिसरातील सामूहिक स्वच्छतेचे नियोजन करा, ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य नियोजन करा, असे अनेक संदेश या स्वच्छता रॅलीतून देण्यात आले.

Loading Comments