Advertisement

संतुलन पर्यावरण स्वच्छता अभियानाचे...!


संतुलन पर्यावरण स्वच्छता अभियानाचे...!
SHARES

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वर्सोवा येथील समुद्र किनाऱ्यावर एक अनोखा उपक्रम राबवला गेला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी समुद्रकिनारी असलेले प्लॅस्टिक मुक्त होणे गरजेचे आहे. नेमक्या याच उद्देशाने रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी या स्वयंसेवी संस्थेने वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवला. साधारण दोन वर्षांपूर्वी समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी अफरोज शाह यांनी पुढाकार घेतला. हळूहळू अनेक जण या उपक्रमात सहभागी झाले.

रविवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्थेचे सहकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा साधारण 400 ते 500 नागरिकांनी समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी आपले श्रमदान केले. आश्चर्य म्हणजे या उपक्रमात काही विदेशी नागरिकांनी देखील सहभाग घेऊन श्रमदान केले. संपूर्ण मुंबईमधून तसेच ठाणे, नवी मुंबई येथील नागरिकांनी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. 'आपण एकट्याने दोन वर्षांपूर्वी समुद्र किनारे प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली होती, आपण कोणालाही बोलवत नाही, ज्याला इच्छा असेल त्याने या उपक्रमात सहभागी व्हावे. कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत राहीन. असे मत अफरोज शाह यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिन हा फक्त नावापुरता न पाळता अफरोज यांनी राबवलेला उपक्रम तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल एवढे मात्र नक्की !

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा