• रस्ता की कचराकुंडी
  • रस्ता की कचराकुंडी
SHARE

बैगनवाडी - कचरा कुंडीच्या आभावामुळे गोवंडीच्या बैगनवाडीतल्या रहिवाशांवर रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळं स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच ठिकाणी स्थानिक नगरसेवकाचे घर आणि कार्यालय आहे. तरीही याकडं दुर्लक्ष होत आहे. स्थानिक रहिवाशी तालिब खान यांनी दिलेल्या माहितीनुसार 'नगरसेवकाच्या घराच्या बाजूलाच हजारो घरांचा कचरा फेकला जातो', 'हा कचरा उचलण्यासाठी वेळेवर गाडीही येत नाही', 'त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे', 'तसंच अनेक आजार उद्भवण्याचा धोकाही निर्माण झाला आहे'.

संबंधित विषय
ताज्या बातम्या