मुख्यमंत्री योगा करतात तेव्हा...

 Mumbai
मुख्यमंत्री योगा करतात तेव्हा...
Mumbai  -  

वेळ - सकाळी सातची...ठिकाण - वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब...एरवी फॉर्मल शर्ट, पँट आणि त्यावर मोदी जॅकेट घालून राजकीय योगा करण्यात व्यग्र दिसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क हाफ टी शर्ट आणि ब्ल्यू ट्रॅक पँटमध्ये स्पोर्ट्स क्लबवर अवतरले होते. निमित्त होतं जागतिक योगा दिनाचं. जिथे त्यांना करायचा होता खराखुरा अनपॉलिटीकल योगा!

दिव्यराज फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आणि शाळकरी मुलांसोबत मुख्यमंत्र्यांनी सेलिब्रिटी फिटनेस गुरू मिकी मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली याेगाचे धडे गिरवले. यावेळी त्यांच्यासोबत होते पत्नी अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि डोळ्यावर काळा गॉगल अशा स्टाईलमध्ये जॅकी श्रॉफ शाळकरी मुलांसोबत रांगेत बसले होते.

व्यासपीठासमोरील पहिल्या रांगेत बसलेले अभिनेते जॅकी श्रॉफ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्राणायाम करुन योगाभ्यासाला सुरुवात केली. सलग 15 ते 20 मिनिटे योगा करून त्यांनी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना आरोग्य सृदृढ ठेवण्यासाठी दैनंदिन स्वरूपात योगा करण्याचा सल्ला दिला.


चांगल्या आरोग्याचा मार्ग योगातूनच!

जगाला चांगल्या आरोग्याचा मार्ग योगाच्या माध्यमातूनच मिळेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. योगाभ्यास झाल्यानंतर माध्यमांसमोर दिलेली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर अकउंटवर शेअर केली आहे.
अमृता फडणवीस रोज करतात योगा...

योगाचे महत्त्व सांगताना अमृता फडणवीस यांनी सांगितले की, योग अभ्यास ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी दररोज योगा करते. त्याचे फायदे देखील मला झालेले आहेत. दैनंदिन जीवनात योगा अत्यंत महत्वाचा असल्याने प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे. योगाचे काही प्रकार मी सहज करते, तर काही प्रकार मला अत्यंत कठीण वाटतात. तरीही मी आवर्जून नवीन योग प्रकार शिकते.


योगा सेलिब्रिटींसाठीच नाही, तर सर्वसामान्यांसाठीही- मिकी मेहता

यावेळी फिटनेस गुरू मिकी मेहता म्हणाले, योगाचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. योगा केल्यामुळे माणसाचे अनेक आजार दूर होतात. योगा केवळ सेलिब्रिटींसाठीच गरजेचा नाही, तर सर्वसामान्य लोकांनी देखील योगा केला पाहिजे.

कार्यक्रमात अभिनेता स्वप्नील जोशी देखील उपस्थित होता. भारतीय जैन संघटना, शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे शिक्षण घेत असलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 400 मुलं आणि मेळघाट-ठाणे परिसरातील 200 आदिवासी विद्यार्थी अशा एकूण 600 मुलांनी या योग शिबिरात सहभाग घेतला.हेही वाचा

1000 नौसैनिकांचा 'आयएनएस विराट'वर विराट योगा!खडसेंचा 'योग' चुकलाच!

अशा प्रकारच्या दिवसांच्या शुभेच्छा सेशल नेटवर्किंग साईटवर दिल्या जातात. यामध्ये अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी पुढे असतात. मात्र अशा शुभेच्छा देताना अनेकदा या मंडळींची मोठी गफलत होते. अशीच एक गफल आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याकडून झाली. योगा दिनाच्या ट्विटरवर शुभेच्छा देताना 21 जून हा योगा दिवस न म्हणता खडसेंनी थेट 20 जून असाच उल्लेख केला. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांपेक्षाही एक दिवस आधीच योग दिन साजरा करणारं त्यांचं हे ट्विट अधिक चर्चेत होतं.योगा हे उत्तम आरोग्याचं औषध - विश्वनाथ महाडेश्वर


विद्यार्थ्यांचा मनावरील ताण कमी करण्यासाठी सायन येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात 2 हजार 400 चौ.फू. जागेवर योग प्रशिक्षण केंद्र, ओपन जिमखाना व फिटनेस सेंटर उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आत्मा आणि परमात्मा यांचा एकमेकांशी अतूट संबंध आहे. त्याला जोडणारा दुवा म्हणजेच योग होय. योग मनुष्याच्या आरोग्यासाठी उत्तम औषध आहे, असा सल्ला महापौर महाडेश्वर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तर, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवून आपल्या आयुष्यातील अपयशाला सामोरे जाण्याची ताकद योगाच्या माध्यमातून मिळवली पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन ब्रम्हकुमारी सपना यांनी केले.हेही वाचा

योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदेधारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येही योग दिवस -

दरम्यान, इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच भाजपचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनी धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत योगा करताना खूप आनंद झाल्याचं ट्विट विनोद तावडेंनी केलं.'योग' भारतीय संस्कृतीने दिलेली अमूल्य देणगी - पंकजा मुंडे

योग ही भारतातील 5 हजार वर्ष जुनी शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक साधना असून ती शरीर आणि मनात परिवर्तन घडवून आणते. योग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, अशा शब्दांत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी योगाचं महत्त्व सांगितलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्या उमरखाडी, डोंगरी येथील निरीक्षणगृहात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी निरीक्षणगृहातील मुलां-मुलींसोबत कपाल भाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भसरीका, ओम ध्यान, ताडासन, वृक्षासन आदी आसनेही केली.


Loading Comments