Advertisement

क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना बीएमसीकडून विशेष सवलत

कोरोना काळात क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना मुंबई महापालिकेकडून आता विशेष सवलत दिली जाणार आहे.

क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना बीएमसीकडून विशेष सवलत
SHARES

कोरोना काळात क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना मुंबई महापालिकेकडून आता विशेष सवलत दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी महापालिकेने मुंबईतील अनेक हॉटेल ताब्यात घेतली होती. यामध्ये तारांकित आणि बिगर तारांकित अशी १८२ हॉटेल होती. या हाॅटेल्सना पालिकेने पैसेही अदा केले आहेत.

त्यानंतर आता त्या कालावधीतील मालमत्ता कराच्या वापरात या हाॅटेल्सना सवलत देण्याचा निर्णय पालिका प्रशासन घेण्याच्या विचारात आहे. एप्रिल ते जून या कालावधीतील हॉटेलच्या मालमत्ता कराचे पैसे वापरकर्ते म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वसूल केले जाणार आहेत. आयुक्तांनी  मालमत्ता करात हाॅटेल्सना सवलत देण्यासाठी आरोग्य विभागाच्या खात्यातून करनिर्धारण आणि संकलन विभागाकडे या कराची रक्कम वळती करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत या सर्व हॉटेलची मालमत्ता कराची रक्कम २२ कोटी ७० लाख रुपये आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक मालमत्ता कराची जी रक्कम महापालिकेला भरणे अपेक्षित आहे. ती रक्कम महापालिका स्वतःच भरणार आहे.



हेही वाचा -

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा

मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी; विमानात चढण्याआधी करणं बंधनकारक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा