Advertisement

विमानात चढण्याआधी मुंबई विमानतळावर होणार प्रवाशांची कोरोना चाचणी

आतापर्यंत ही सुविधा फक्त आगमन होणाऱ्या प्रवाशांसाठी होती. परंतू, आता प्रवाशांना सोडायला येणाऱ्यांना देखील अशी चाचणी करू शकणार आहेत.

विमानात चढण्याआधी मुंबई विमानतळावर होणार प्रवाशांची कोरोना चाचणी
SHARES

कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकार (state government) व महापालिकेनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानात चढण्याआधीच कोरोना चाचणी करता येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (chhatrapati shivaji maharaj international airport) ही सुविधा उभी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ३,३४० प्रवाशांनी चाचणी केली असून, त्यामध्ये २,९३० पुरुष आणि ४०० महिला प्रवाशांचा समावेश होता. विमानतळावर दररोज सरासरी १०० चाचण्या होत आहेत. आजवर ३८ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आतापर्यंत ही सुविधा फक्त आगमन होणाऱ्या प्रवाशांसाठी होती. परंतू, आता प्रवाशांना सोडायला येणाऱ्यांना देखील अशी चाचणी (corona test) करू शकणार आहेत. २५ मार्चपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलत विमानतळावरच प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचं आवाहन विमानतळ परिचालन करणाऱ्या कंपन्यांना दिलं होतं. त्यानुसार मुंबईच्या विमानतळावर 'आरटी-पीसीआर' या चाचणीची सोय ६ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली.

सुरुवातीला 'वंदे भारत' अभियानाद्वारे परदेशातून परतणाऱ्या व त्यानंतर देशांतर्गत विमानसेवेद्वारे अंतिम ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा होती. त्यानंतर विमानतळावर (mumbai airport) आगमन होणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली. त्याच सेवेचा विस्तार करीत आता मुंबईहून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या जलद कोरोना चाचणीची सुविधा मिळणार आहे.

विमानतळावरील कोरोना चाचणी

  • टर्मिनल २ मधील चौथ्या मजल्यावर या चाचणीची सोय करण्यात आली आहे. 
  • बाहेर जाणारे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या www.csmia.aero या संकेतस्थळावर किंवा मदत कक्षावर येऊन नोंदणी करू शकतील. 
  • नोंदणीनंतर चाचणी केली जाईल. 
  • ८ तासांत चाचणीचा अहवाल प्रवाशांना मिळेल. 
  • प्रवाशांनी नियोजित वेळेच्या ८ ते १२ तास आधी विमानतळावर यावं.
  • या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रवासी संस्थात्मक विलगीकरणातून मोकळे होतील.हेही वाचा -

मुंबईकरांना पहाटे थंडीची चाहुल

महिलांच्या प्रवासामुळं 'लोकल'प्रवाशांमध्ये लाखांची भर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय