Advertisement

मुंबईकरांना पहाटे थंडीची चाहुल

मुंबईतील वातावरणात पहाटे गारठा जाणवायला सुरुवात झाली.

मुंबईकरांना पहाटे थंडीची चाहुल
SHARES

मंगळवारची पहाट मुंबईकरांसाठी आनंदाची होती. कारण अनेक मुंबईकरांना पहाटे थंडीची चाहुल लागली. मुंबईतील वातावरणात पहाटे गारठा जाणवायला सुरुवात झाली. गारठा जाणवत असला तरी, दिवसा मात्र तापमानात घट होण्याची प्रतीक्षा मुंबईकरांना कायम आहे. तसंच, अनेक ढगाळ वातावरण असल्यानं ऊन, पावसाच्या या खेळात आणखी उकाडा होत आहे.

मुंबईत सध्या थंड वातावरण असून, या तुलनेत किमान तापमानाचा पारा तेवढा खाली उतरलेला नाही. त्यामुळं थंडीची चाहूल लागली तरी, मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाला समोरं जावं लागतं आहे. दरम्यान, सतत बदलणाऱ्या या वातावरणामुळं मुंबईकरांना साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे.

राज्यातून परतीच्या पावसाला सोमवारपासून सुरुवात झाली असून, पुढच्या २४ तासात बहुतांश भागातील पाऊस माघारी निघणार असल्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी वर्तवला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना होसाळीकर यांनी महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू झाली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि उत्तर कोकणातून मान्सूननं माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा (तेलंगाणा) आणि इतर भागातून होत आहे. या भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता देखील दत्तात्रय होसाळीकर यांनी सोमवारी वर्तवली आहे.हेही वाचा -

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबा दाखल

कोरोनाकाळात मुंबई आयआयटीनं निर्मित केले ४० संशोधन प्रकल्प


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा