Advertisement

पैशांअभावी रखडलं गझधरबंद पम्पिंग स्टेशनचं काम

खार-सांताक्रूझ येथील गझधर बंद पम्पिंग स्टेशनच्या कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. या कामासाठी प्रतिभा इंडस्ट्रीज कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. करारनुसार कंपनीने हा प्रकल्प गेल्या वर्षी पूर्ण करणं अपेक्षित होतं. परंतु कंपनीने नियोजित वेळेत काम न केल्यामुळे कंपनीला या कामासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. परंतु ही मुदतवाढ लेखी स्वरुपात न दिल्यामुळे या कंपनीला कामासाठी निधी उभारण्यास अडचण निर्माण होऊ लागली.

पैशांअभावी रखडलं गझधरबंद पम्पिंग स्टेशनचं काम
SHARES

ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या पम्पिंग स्टेशनच्या कामांपैकी सांताक्रूझच्या गझधर बंद येथील पम्पिंग स्टेशनचं काम रखडल्याने संबंधित कंत्राट कंपनीला महापालिकेने नोटीस बजावली आहे. प्रशासनाने या कंपनीला कामासाठी लेखी स्वरुपात मुदतवाढ न दिल्यामुळे कंपनीला बँकांकडून कर्ज उभारण्यास अडथळा येत आहे. परिणामी पम्पिंग स्टेशनच्या कामात मोठा बांध निर्माण झाल्याचं सत्य समोर येत आहे. एका प्रकारे प्रशासनाने या कंपनीची आर्थिक कोंडीच केल्याची बाबही समोर येत आहे.


यामुळे झाली आर्थिक कोंडी

खार-सांताक्रूझ येथील गझधर बंद पम्पिंग स्टेशनच्या कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. या कामासाठी प्रतिभा इंडस्ट्रीज कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. करारनुसार कंपनीने हा प्रकल्प गेल्या वर्षी पूर्ण करणं अपेक्षित होतं. परंतु कंपनीने नियोजित वेळेत काम न केल्यामुळे कंपनीला या कामासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. परंतु ही मुदतवाढ लेखी स्वरुपात न दिल्यामुळे या कंपनीला कामासाठी निधी उभारण्यास अडचण निर्माण होऊ लागली.


म्हणून काम रखडलं

आधीच नोटाबंदी आणि त्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या कंपनीला पम्पिंग स्टेशनचं काम वेळेत पुढे हाकता आलेलं नाही. त्यातच कंपनीला बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी मुदतवाढीचे कागदोपत्री सादर करता येत नसल्याने पैशांअभावी हे काम संथ गतीने सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.


मुदतवाढ नसतानाही काम सुरुच

याठिकाणच्या कामाची पाहणी केली असता, आजही या ठिकाणी प्रतिभा इंडस्ट्रीज कंपनीचे ३५ ते ४० कर्मचारी कार्यरत असल्याचं दिसून आलं. महापालिकेने ३१ मे २०१८ ची मुदतवाढ कागदोपत्री दिली नसली, तरीही या कंपनीने काम सुरु ठेवल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.


जूनपर्यंत होईल पम्पिंग स्टेशन सुरु

ही कंपनी आर्थिक संकटात असली तरी या पम्पिंग स्टेशनमध्ये बसवण्यात येणारे स्क्रीन जर्मनीवरून मागवण्यात आले आहेत. त्यासाठी जर्मनीतील कंपनीला इथून तिथून जमा करून कोट्यवधी रुपये भरण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या २-४ दिवसांमध्ये ही स्क्रीन उपलब्ध झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथील ६ पैकी किमान २ ते ३ पंप सुरु केले जातील, असंही या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. याच कंपनीने इर्ला पम्पिंग स्टेशनचं काम नियोजित वेळेत पूर्ण केलं होतं.


तर प्रकल्प वेळीच पूर्ण झाला असता

आमची कंपनी २० ते २२ वर्षे जुनी आहे. आजवर आम्ही अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण केले आहेत. त्यामुळे हाही प्रकल्प आर्थिक संकटाचा सामना करत का होईना, पण लवकरच पूर्ण करून देण्यात येईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. महापालिकेने कागदोपत्री मुदतवाढीचं पत्र यापूर्वी दिलं असतं, तर बँकेतून कर्ज उभारुन प्रकल्प वेळीच पूर्णही करता आला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


कंपनीचं कंत्राट कायम

यासंदर्भात प्रतिभा इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक श्याम कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रकल्पाचं काम सुरु असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, असं सांगितलं. मात्र अधिक बोलण्यास नकार दिला.

तर, महापालिकेच्या अभियांत्रिक सेवा व प्रकल्प विभागाचे संचालक विनोद चिठोरे यांनी, संबंधित कंपनीचं कंत्राट महापालिकेने रद्द केलेलं नाही. त्यामुळे ते काम करू शकतात. केवळ कंपनीने कामाला गती न दिल्याने त्यांना लेखी स्वरुपात मुदतवाढ दिली नसल्याचं त्यांनी म्हटलं.



हेही वाचा-

अंधेरी पूर्वेला जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया

नेदरलॅण्डची राणी डबेवाल्यांना भेटणार!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा