Advertisement

Coronavirus Updates : 'इतके' क्विंटल श्रीखंड व फुले संकटात

गुढीपाडव्याच्या दिवशी मालाची आवक वाढणे अपेक्षित होते. मात्र बाजार बंद राहणार असल्यानं लाखो किलोंची उलाढाल थांबणार आहे.

Coronavirus Updates : 'इतके' क्विंटल श्रीखंड व फुले संकटात
SHARES

दरवर्षी गुढीपाडव्याला फुल व फुलांच्या तोरणांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळं व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेली संचारबंदी यामुळं गुढीपाडव्याच्या बाजाराला फटका बसला आहे. गुढीपाडव्यानिमित्त गोडाचा पदार्थ म्हणून श्रीखंडाला नागरिकांची पसंती असते. मात्र, यंदा मुंबईभरात जवळपास १०० क्विंटल श्रीखंड व १२०० किलो फुलांचा बाजार संकटात आला आहे.

दादरच्या घाऊक फुल बाजारात या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्तानं शेकडो किलो माल येतो. मात्र, आता २० मार्चपासूनच बंद असलेला हा बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मालाची आवक वाढणे अपेक्षित होते. मात्र बाजार बंद राहणार असल्यानं लाखो किलोंची उलाढाल थांबणार आहे.

गुढीपाडव्याला मुंबईत १० हजार किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून किमान १ लाख किलो श्रीखंडाची विक्री होते. याखेरीज मिठाई आणि अन्य पदार्थांचा आकडादेखील जवळपास तेवढाच आहे. करोनामुळे श्रीखंडाखेरीज किमान ५० ते ६० क्विंटल मिठाई बाजाराला फटका बसणार आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates : गुढीपाडव्याला प्रथमच शुकशुकाट

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा