Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १५४० नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू

मुंबईत दिवसभरात १५४० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत १५४० नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १५२ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १५४० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी   दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर १० जून रोजी ९७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ९ जून रोजी रोजी एकूण ५८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १५४० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५३ हजार ९८५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ५१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २४ हजार २१६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी बागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

हेही वाचाः- लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

सक्रीय कंटेनमेंट झोन (चाळ)  ७७५

सीलबंंद इमारती ४०७१

२४ तासातील संपर्काचा शोध अति जोखिम  ८४९४

CCC1 मधील अति जोखीम  २७,७०८

CCC1 मध्ये भर्ती असलेले अतिजोखिम ९७०७४

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा