Advertisement

Coronavirus Updates: बनावट वेळापत्रके विश्वास न ठेवण्याचे विद्यापीठाचं आवाहन

पालक आणि विद्यार्थी, शिक्षकांनी यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पुन्हा एकदा विद्यापीठाकडून करण्यात आलं आहे.

Coronavirus Updates: बनावट वेळापत्रके विश्वास न ठेवण्याचे विद्यापीठाचं आवाहन
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत चालला आहे. त्यामुळं या व्हायरसचा धोका लक्षात घेत सरकारच्या निर्देशाप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा १४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाकडून यासबंधीत परिपत्रक ही काढण्यात आलं आहे. पुढील निर्देशाप्रमाणे निर्णय घेऊन परीक्षांचं वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याची सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही काही समाज कंटकाकडून खोटी वेळापत्रके विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या WhatsApp ग्रुपवर व्हायरल होत आहेत. 

पालक आणि विद्यार्थी, शिक्षकांनी यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पुन्हा एकदा विद्यापीठाकडून करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच प्रकारच्या परीक्षा लांबणीवर पडल्यानं विद्यार्थी आणि पालक वर्ग आधीच चिंताग्रस्त आहे. नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार, त्यानुसार परीक्षा कधी होणार आणि त्याचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालक विद्यार्थ्यांमध्ये आहे. 

विद्यापीठ परीक्षेबाबत तसेच काही महाविद्यालयाचे लेटरहेड मॉर्फ (Morph) करून महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात चुकीचे संदेश समाजमाध्यमातून फिरत आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊ नये. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात १४ एप्रिलनंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परीस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असं परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्यात येणार

९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा