Advertisement

रेशन दुकानांवर मिळणार मोफत डाळ- छगन भुजबळ

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तूरडाळ मोफत वाटप (free tur pluses or chana pluses) केली जाणार आहे.

रेशन दुकानांवर मिळणार मोफत डाळ- छगन भुजबळ
SHARES

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तूरडाळ मोफत वाटप (free tur pluses or chana pluses) केली जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Food and civil supply minister chhagan bhujbal) यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने (ration card holder) विविध योजना राबविण्यात येत असून अन्नधान्याचं वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ (free rice) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत डाळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा- राज ठाकरेंची सूचना वास्तववादी, छगन भुजबळांचंही समर्थन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्ड धारकाने (ration card holder)नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, कार्ड धारकाला १ किलो चणाडाळ किंवा तूरडाळ मोफत देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रती महिना १६ हजार मेट्रिक टन चणाडाळ व तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलं. 

दरम्यान, केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्न,नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेतला आहे. मका पिकाला नगदी पिक म्हटलं जातं. मात्र लॉकडाऊनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आल्यामुळे राज्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा