Advertisement

मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठीही आता ऑनलाईन बुकिंग

मुंबईत आता अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन वेळ घ्यावी लागणार आहे. लवकरच ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठीही आता ऑनलाईन बुकिंग
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दररोज ५०० हून अधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये मृतांची संख्याही अधिक आहे. त्यामुळं स्मशानभूमीत दररोज गर्दी होत आहे. याआधी विद्यूत दहिनीमध्ये ५ मिनीटाला एक मृतदेह जात असल्यानं बिघाड झाला होता. परिणामी यामुळं मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना तासंतास उभं राहावं लागत होतं. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता महापालिकेनं यावर तोडगा काढला आहे. मुंबईत आता अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन वेळ घ्यावी लागणार आहे. लवकरच ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

मुंबईतील स्मशानभूमींची सद्यस्थिती कळावी यासाठी महापालिका संगणकीय ‘डॅशबोर्ड’ विकसित करत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून ऑनलाईन वेळ दिली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही सेवा कार्यान्वित होणार आहे. स्मशानभूमींच्या सद्यस्थितीची माहिती पालिकेच्या 1916 या हेल्पलाइनशी संलग्न केली जाणार आहे. कुठल्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार सुरू असून, पुढील अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाईन मिळणार आहे.

विद्युत किंवा गॅस दाहिनींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ही यंत्रणा काही कालावधीसाठी बंद ठेवली जाते. तर कधी देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी बंद ठेवावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेता एका विद्युत किंवा गॅस दाहिनींमध्ये २४ तासात ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमींवर ताण येत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना वस्तूस्थिती कळावी यासाठी ही माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.



हेही वाचा -

मालवाहू बसमुळं एसटीला २१ लाखांचे उत्पन्न

१०वी-१२वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीचं ८५ टक्के काम पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा