Advertisement

दादरमधील ९७ इमारतींमध्ये कडक लॉकडाऊन


दादरमधील ९७ इमारतींमध्ये कडक लॉकडाऊन
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. जवळपास ३ महिन्यांहुन अधिक दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र, लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात नागरिकांना दिलासा देण्यात आला. अनलॉक 1.0 च्या मध्यमातून नागरिकांना कामासाठी व व्यायामासाठी घराबाहेर पडण्याची संधी मिळाली. परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथिल केल्यानंतर सुरू झालेल्या बाजारपेठा, रस्त्यांवरील वाढलेली वर्दळ आदी विविध कारणांमुळे दादरमधील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.

धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात येत असताना दादरमधील वाढणारी रुग्णसंख्या महापालिकेसाठी डोकेदुखी बनली आहे. रुग्ण सापडल्याने दादरमधील सुमारे ९७ इमारतीमध्ये कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. 

मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. एप्रिलअखेरीस दादरमध्ये अवघे ३३ करोनाचे रुग्ण होते. मे अखेरीस दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या ३१९ वर पोहोचली होती. मात्र ५ जुलैपर्यंत येथील रुग्णसंख्या ९५६ वर पोहोचली आहे.

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने २३ मे रोजी दादरमधील २५ इमारतींपैकी काही अंशत:, तर काही पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आल्या होत्या. मात्र आता दादरमधील लॉकडाऊन इमारतींची संख्या ९७ वर पोहोचली आहे.

दादरचीमधील बाजारपेठा मंडई यामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा भाजीबाजार सोमय्या मैदान आणि वांद्रे-कुर्ला संकुलात तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आला होता.

लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिल झाल्यानंतर दादरकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहे. परिणामी रस्त्यावर वर्दळ वाढल्याने एप्रिल, मेच्या तुलनेत जूनमध्ये दादरमधील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.हेही वाचा - 

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णयRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा