Advertisement

आर्थिक संकटामुळं अनेकांचा मासे विक्रीकडे कल


आर्थिक संकटामुळं अनेकांचा मासे विक्रीकडे कल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसर राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. तब्ब्ल ३ महिन्यांहून अधिक काळ लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं. अनेकांनी व्यवसाय ठप्प झाल्यानं अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं. त्यामुळं रोजगाराचा पर्याय शोधत मागील २ महिन्यात बहुतेक जणांनी घरपोच मासे आणि भाजी विक्री सुरू केली आहे.

मासेविक्री करत अनेकांनी धीर सोडला असून, ओळखीच्या व्यक्तीकडून घरपोच मासे मिळत असल्यानं त्याला प्रतिसाद ही चांगाल मिळत आहे. लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार कपात करण्यात आले. स्वतंत्र व्यावसायिकांचे व्यवसाय खंडित झाले. यावर उपाय म्हणून काहींनी घरपोच मासे, भाजी विक्री व्यवसाय हाती घेतला आहे.

मासे आणण्यासाठी मासळी बाजारात जाणे किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर मासे मिळणे किंवा एखाद्या अन्य भाषिकाने आणलेल्या टोपलीतील मासळी घेणे हे यापूर्वीचे पर्याय असायचे. मात्र टाळेबंदीत एरवीच्या अन्य भाषिकांचे प्रमाण जवळपास बंदच झाले. तर गल्लीच्या कोपऱ्यावरील मासे विक्री मर्यादित होऊ लागली. या व्यवसायातील नेमकी ही कमतरता अनेकांना सध्या उपलब्ध झाल्याचे यातून दिसून येते.



हेही वाचा -

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा