Advertisement

मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण १२ टक्क्यांनी जास्त

मुंबईतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे.

मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण १२ टक्क्यांनी जास्त
SHARES

मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, एकट्या मुंबईचा कोरोनाचा आकडा १० हजारांच्या पुढे आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण देशात सरासरी ३ टक्के आहे, तर मुंबईत १५टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यावर काळजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या २ राज्यातील कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थितीवर लक्ष ठेवून संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या १२ लाख ७६ हजार ७८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५०००० जण पॉझिटिव्ह निघाल्याचं समजतं. त्यानुसार, देशातील पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण सध्या ३ टक्के आहे. त्याशिवाय, मुंबईत करण्यात आलेल्या चाचण्यांनुसार, ११००० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानुसार मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण १५ टक्के इतकं आहे.

बुधवारी आणखी २५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ४१२ वर गेला आहे. मृतांमध्ये १५ पुरुष व १०महिला आहेत. तर ६ रुग्णांना कोणताही आजार नव्हता. मुंबईतील करोना रुग्णांचा मृत्युदर ३.९ टक्के आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येत्या १५ दिवसात मुंबईत आणखी कोरोना काळजी केंद्र उभारण्याचं पालिकेनं ठरवलं आहे.



हेही वाचा -

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजारांच्या पुढे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा