Advertisement

मागील ९ दिवस मुंबईत कोरोनाने घेतला ४६० जणांचा बळी

मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनामुळं होणाऱ्या मृतांचे प्रमाणं ३० टक्क्यांनी वाढलं आहे.

मागील ९ दिवस मुंबईत कोरोनाने घेतला ४६० जणांचा बळी
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावासह मृत्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. जूनमधील पहिल्या ९ दिवसांत दरदिवशी सरासरी ५३ मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मे महिन्यांतील पहिल्या ९ दिवसांत हे प्रमाण ४१ होतं. परंतु, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनामुळं होणाऱ्या मृतांचे प्रमाणं ३० टक्क्यांनी वाढलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये मुंबईत ४८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर, १ जून रोजी ४० जणांचा मृत्यू करोनामुळं झाला होता. तर, त्यानंतरच्या ३ दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला. या आठवड्यात मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यूनं उच्चांक गाठला असून सोमवारी तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं मुंबईतील रोजची रूग्णवाढ आणि मृत्यू दर खाली येऊ लागला आहे.

सोमवारी रूग्णदर ३.५. टक्के तर मृत्यू दर ३ टक्क्यांपर्यंत आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येनं ५० हजारांचा आकडा पार केला आहे. मुंबईची दैनंदिन रूग्णवाढ ३.५ आली आहे तर भायखळा आणि माटुंगा-शीव-वडाळा परिसरात १.६ इतकी नोंदवली आहे. महापालिकेच्या ई विभागात भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा अशा दाटीवाटीच्या लोकवस्तीचा परिसर येतो. त्यामुळे या भागात नागरिकांचा जवळून संपर्क आल्यानं एप्रिल आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १२० जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १०१५ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी   दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.



हेही वाचा -

गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई

पालघर जिल्ह्यात ४० वर्षीय पोलीसाचा कोरोनामुळं मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा