Advertisement

स्वच्छता कर्मचाऱ्यांची 'या' मागण्यांसाठी निदर्शनं

स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आपल्या मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी केली.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची 'या' मागण्यांसाठी निदर्शनं
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्वच्छता कर्मचाऱ्यांकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे. तसंच, या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आरोप करत प्रलंबित प्रश्न न सुटल्यानं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चेंबूर येथील महापालिकेच्या एम पश्चिम विभागासमोर बुधवारी निदर्शनं केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आपल्या मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी केली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • महापालिकेच्या सफाई खात्यातील मृत, सेवानिवृत्त व वैद्यकीय असमर्थ कामगारांचं पेन्शन, उपदान, भविष्य निर्वाह निधी व वारसांना नोकरी हे प्रश्न निकाली काढण्यात यावेत. 
  • कामगारांच्या रजा, प्रवास भत्ता तसंच फंडाच्या पावतीवर वारसांची नावे या कामांकडं दुर्लक्ष न करता ती कामे पूर्ण करण्यात यावीत. 
  • कामगारांचे विविध अर्ज लिपिकांकडून हरवले गेले असून कामगारांच्या हक्काच्या रजाही कापल्या जात आहेत, त्या रजा कामगारांना वेळोवेळी मिळाव्यात. कामगारांना लागणारे मास्क, सॅनिटायझर, साबण, टॉवेल व गणवेश या वस्तू वेळेवर व नियमित देण्यात याव्यात.
  • स्वच्छता कर्मचाऱ्यास १२ वर्षे पूर्ण झाली असल्यास त्या कामगारास कालबद्ध पदोन्नती म्हणून मुकादम वेतन देण्यात यावे. 
  • राखीव कामगार व मुकादम यांना रिक्त झालेल्या जागांमध्ये भरती करण्यात यावे. 
  • स्वच्छता कर्मचारी आपल्या अडचणी वरिष्ठांना सांगण्यास गेले असता त्यांना चांगली वागणूक देण्यात यावी.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही स्वच्छता कर्मचारी झोपडपट्ट्यांमध्ये काम करीत आहेत, तसेच सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ ठेवत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे अशाही मागणी करण्यात आल्या.



हेही वाचा -

जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात ८२ टक्के प्रवासी घट

एसटी कामगारांचा सामुहीक रजेवर जाण्याचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा