Advertisement

केईएम रुग्णालयात 'इतके' मृतदेह पडूनच

कोरोनानं मृत पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईकांनी दखल न घेतल्यामुळं रुग्णालयात मृतदेह पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केईएम रुग्णालयात 'इतके' मृतदेह पडूनच
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राग्णांच्या संखअयेत वाढ होत आहे. तसंच, रुग्ण संख्येबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. विशेष म्हणजे कोरोनानं मृत पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईकांनी दखल न घेतल्यामुळं रुग्णालयात मृतदेह पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील परळ येथील के.ई.एम. रुग्णालयाच्या शवागरात ७ रुग्णांचे मृतदेह पडून आहेत. याप्रकरणी नातेवाईक न आल्यामुळं हे मृतदेह शवागारातच ठेवण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कोरोनाची लागण झाल्यामुळं केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचं पार्थिव रुग्णालयाच्या शवागारातच पडून आहेत. एकापैकी एकाचा मृत्यू तीन आठवड्यांपूर्वी झाला आहे. या ७ ही मृत रुग्णांचे नातेवाईक अद्याप आलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात येत आहे. परंतु त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं मृतदेह शवागारातच ठेवण्यात आले आहेत.

या प्रकरणी मे महिन्यात झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीतही चर्चा करण्यात आली असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. नातेवाईकांशी संपर्कच होऊ न शकल्यामुळं, तसंच पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी न मिळाल्यानं या मृतदेहाची विल्हेवाट लावणं महापालिकेला अवघड बनलं आहे. या संदर्भात पालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडूनही याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून या मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर १० जून रोजी ९७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ९ जून रोजी रोजी एकूण ५८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १५४० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५३ हजार ९८५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ५१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २४ हजार २१६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

वाहतुकीच्या कोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

क्रॉफर्ट मार्केट परिसरात भीषण आग, महापौरांचा उंदरावर आरोप...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा