Advertisement

हॉटेल, रेल्वे, मेट्रो नको; लोकांना सतावते भीती


हॉटेल, रेल्वे, मेट्रो नको; लोकांना सतावते भीती
SHARES

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जात असून अनेक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. असं असलं तरी लोकांना या संसर्गजन्य आजाराबद्दल भीती वाटत आहे. याबाबत एका एका सर्वेक्षणात माहिती मिळाली आहे. हॉटेलांमध्ये जेवायला जायला वा रेल्वे वा मेट्रोनं प्रवास करायला ५० टक्क्यांहून अधिक लोकांची तयारी नसल्याचं या सर्वेक्षणातून समजत आहे.

देशातील २४१ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तब्बल २४ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातून लोकांना अद्याप घराबाहेर पडण्यास काहीशी भीती वाटत आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६७ टक्के लोकांनी आम्ही आणखी किमान एक महिना तरी रेल्वे वा मेट्रोनं प्रवास करणार नाही, असे सर्वेक्षणात म्हटलं आहे.

९३ टक्के लोकांनी हॉटेलांमध्ये राहण्याची सध्या तयारी दिसत नाही, असे हे सर्वेक्षणात स्पष्य करण्यात आलं आहे. काही ठिकाणी जिम, स्विमिंग पूल सुरू झाले वा होत असले तरी तिथेही जाण्याची लोकांची तयारी दिसत नाही. तब्बल ८४ टक्के लोकांनी आम्ही तिथे जाण्यापेक्षा घरीच व्यायाम करू, असे म्हटले आहे. गेल्या तसंच, वाढते पेट्रोल दर व मनातील भीतीनं वाहतुकीचा वापर करणं टाळलं आहे.हेही वाचा -

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णयसंबंधित विषय