Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू

या ७ दिवसांच्या बंदनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ३ मार्केट पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील भाजीपाला मार्केट ७ दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. या ७ दिवसांच्या बंदनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ३ मार्केट पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळं मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. एक आठवड्यानंतर एपीएमसी सुरू होणार असल्यानं खरेदीसाठी गर्दी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच आत सोडण्यात येत होतं. भाजीपाला मार्केटमध्ये ९३ वाहनांची आवक झाली. ३२९ टेम्पोंमधून भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्यात आला. फोनवरूनच ऑर्डर घेण्यास प्राधान्य देण्यात आलं होतं. मसाला मार्केटमध्ये १७७ वाहनांची आवक झाली. धान्य मार्केटमध्ये सोमवारी आवक बंद ठेवली होती. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मालाची विक्री करण्यात आली. संध्याकाळपर्यंत २०८ वाहनांमधून अन्नधान्य मुंबईत पाठविण्यात आले.

एपीएमसीमधील फळ व कांदा मार्केट गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. कांदा व बटाट्याचे ७५ टेम्पो थेट मुंबईत पाठविण्यात आले आहेत. दिवसभर मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती व्यापारी व बाजार समिती प्रशासनाने दिली.हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत

मुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा