Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

Coronavirus: थुंकणाऱ्यांकडून तब्बल १,०७,००० हजार रुपयांचा दंड वसूल

कारवाईतून पालिकेने तब्बल १ लाखांचा दंडवसूल केला

Coronavirus: थुंकणाऱ्यांकडून तब्बल  १,०७,००० हजार रुपयांचा दंड वसूल
SHARES

राज्यात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्यांवर कारवाईचा बडघा उगारला आहे. या कारवाईतून पालिकेने तब्बल १ लाखांचा दंडवसूल केला आहे. ऐवढेच नाही तर ४६ जणांना उघड्यावर थुंकल्यास कारवाई कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

 हेही वाचा:-जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई- छगन भुजबळ

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा ४७  वर पोहचला आहे.  याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून यापूर्वी २०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार होता. मात्र त्यात आता वाढ करण्यात आली असून तो १ हजार रुपये केला आहे.कोरोना व्हायरसबाबत काळजी घेत मुंबई महापालिकेने उघड्यावर थुंकणाऱ्या एकूण १०७ जणांकडून तब्बल १,०७,००० हजार रुपयांच्या दंडाची वसूली केली आहे. ऐवढेच नाही तर ४६ जणांना उघड्यावर थुंकल्यास कारवाई करु असा इशारा दिला आहे.

  हेही वाचा:-Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...

तसेच महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार, जिम, मॉल, गिरणी कंपाऊंड, स्पा सेंटर, क्लब, पब, डिस्को, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि इतर करमणूक उद्याने मुंबईत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचसोबत शाळा-महाविद्यालये येत्या 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. पुण्यात अजून एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सदर महिलेने फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्स येथून प्रवास करुन भारतात दाखल झाली होती. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत माहिती दिली आहे. तसेच भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा आकडा १४० च्या पार गेला आहे. यापैकी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा