Advertisement

मुंबईत १०५९ नवे रुग्ण, तर दिवसभरात ४५ जणांचा मृत्यू

शनिवारी दिवसभरात ८३२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८७ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत १०५९ नवे रुग्ण, तर दिवसभरात ४५ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी पहिल्यांदा कोरोना रुग्णांनी ३०० मृत्यूंचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोरोनाने राज्यात शनिवारी ३२२ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १०५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे! ३२२ जणांचा दिवसभरात मृत्यू, ९६०१ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५ रुग्ण दगावले आहेत. तर ३० जुलै रोजी ५३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३१ जुलै रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय शनिवारी मुंबईत कोरोनाचे १०५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १५ हजार ३४६ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ८३२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८७ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी

राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४९  हजार २१४  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ९४ हजार ९४३ नमुन्यांपैकी ४ लाख ३१ हजार ७१९ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ०८ हजार ०९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः-पुनर्विकासाला मिळणार गती, मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता वेगळं एसआरए

आज निदान झालेले ९६०१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०४७ (४५), ठाणे- १९७ (१२), ठाणे मनपा-२२४ (७),नवी मुंबई मनपा-३४९ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२८३ (६),उल्हासनगर मनपा-४१ (४), भिवंडी निजामपूर मनपा-१९ (३) , मीरा भाईंदर मनपा-१०९(१),पालघर-१२९ (२), वसई-विरार मनपा-१८० (१२), रायगड-२७१ (२६), पनवेल मनपा-१४६(२), नाशिक-१३८ (६), नाशिक मनपा-३१८ (६), मालेगाव मनपा-२१ (१), अहमदनगर-२५६ (२),अहमदनगर मनपा-२३५ (४), धुळे-११ (२), धुळे मनपा-१९, जळगाव-१२४ (१७), जळगाव मनपा-१४९ (३), नंदूरबार-१३ (१), पुणे- ४६१ (२१), पुणे मनपा-१४४१ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-७९७ (१३), सोलापूर-१९८ (६), सोलापूर मनपा-२७ (१), सातारा-१९८ (६), कोल्हापूर-४९५ (४), कोल्हापूर मनपा-१११ (४), सांगली-७९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९५ (७), सिंधुदूर्ग-६, रत्नागिरी-४५ (२), औरंगाबाद-९३ (६), औरंगाबाद मनपा-२२ (११), जालना-२२ (१), हिंगोली-५ (१), परभणी-१३ , परभणी मनपा-१५, लातूर-११८ (४), लातूर मनपा-४९ (२), उस्मानाबाद-३३ (६), बीड-४९ (२), नांदेड-७८, नांदेड मनपा-८ (२), अकोला-३१ (१), अकोला मनपा-१४, अमरावती- ४० (२), अमरावती मनपा-१४१(२), यवतमाळ-१०१, बुलढाणा-८० (२), वाशिम-७ (१), नागपूर-२११ , नागपूर मनपा-१४१ (२), वर्धा-९, भंडारा-३, गोंदिया-२७, चंद्रपूर-३९, चंद्रपूर मनपा-१०, गडचिरोली-३, इतर राज्य ७ (१).

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा