Advertisement

पुनर्विकासाला मिळणार गती, मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता वेगळं एसआरए

सर्वसामान्य गरीब माणसाच्या घरांचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रात देखील झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुनर्विकासाला मिळणार गती, मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता वेगळं एसआरए
SHARES

सर्वसामान्य गरीब माणसाच्या घरांचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रात देखील झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. तब्बल ५ वर्षानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं झाली. (maharashtra government to form separate SRA for MMR)

मुंबई महानगर वगळता उर्वरित एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल व योजना गतीने पूर्ण होईल. 

हेही वाचा - धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये जे काही बदल करणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर केलं जातील. तसंच स्ट्रेस फंड उभारण्याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणला जाईल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महानगर वगळता उर्वरित मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण उभारण्यात यावं.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना विकासकाला सवलती जरूर दिल्या पाहिजेत. परंतु त्यांनी कालमर्यादेत काम करण्याचं बंधनही त्यांच्यावर घातलं पाहिजे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - Stress Fund For SRA: रखडलेल्या झोपु योजनांसाठी निधी उभारणार- जितेंद्र आव्हाड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा