Advertisement

मुंबईत कोरोनाचे १२०० नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू

गुरूवारी दिवसभरात ८८४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ९५४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १२०० नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोने ४१३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात १२०० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४८ रुग्ण दगावले आहेत. तर १२ आँगस्ट रोजी ५० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ११ आँगस्ट रोजी एकूण ४८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १२०० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २७ हजार ५७१ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ८८४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ९५४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Gunjan Saxena The Kargil Girl review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप

राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,८१३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.

Read this story in हिंदी
संबंधित विषय