Advertisement

मुंबईत कोरोनाचे २१०९ नवे रुग्ण, ४८ जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात २३४७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ७६ हजार ०१७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २१०९ नवे रुग्ण, ४८ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोनाने ३२६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात २१०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४८ रुग्ण दगावले आहेत. तर ३ सप्टेंबर रोजी ४३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १ आँक्टोंबर रोजी एकूण ४३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २१०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख १४ हजार ४४५ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात २३४७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ७६ हजार ०१७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-प्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना

राज्यात आज १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नविन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १३,७०२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२१०९ (४८), ठाणे- २४८ (२), ठाणे मनपा-३६० (७), नवी  मुंबई मनपा-२७८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४१४ (८), उल्हासनगर मनपा-५२, भिवंडी निजामपूर मनपा-५३ (२), मीरा भाईंदर मनपा-१९९ (५), पालघर-१२० (२), वसई-विरार मनपा-१३६ (२), रायगड-१९२ (५), पनवेल मनपा-१७१ (३), नाशिक-३३८ (२), नाशिक मनपा-६६४ (६), मालेगाव मनपा-३२, अहमदनगर-५४४ (७), अहमदनगर मनपा-९५, धुळे-१५ (१), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-१४० (७), जळगाव मनपा-८३ (१), नंदूरबार-२३, पुणे- ८१४ (१२), पुणे मनपा-१०३३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (४), सोलापूर-३६० (५), सोलापूर मनपा-६० (१), सातारा-६४५ (४८), कोल्हापूर-१९८ (६), कोल्हापूर मनपा-५९ (२), सांगली-४०३ (११), सांगली  मिरज कुपवाड मनपा-६९ (३), सिंधुदूर्ग-२५ (३), रत्नागिरी-८१ (४), औरंगाबाद-५५ (१),औरंगाबाद मनपा-१९३ (५), जालना-८६ (४), हिंगोली-२८ (१), परभणी-६४, परभणी मनपा-२६ (३), लातूर-११३ (२), लातूर मनपा-७९ (२), उस्मानाबाद-१३६ (२), बीड-१५८ (१०), नांदेड-५६ (२), नांदेड मनपा-५८ (१), अकोला-२० (१), अकोला मनपा-४७, अमरावती-५८ (१), अमरावती मनपा-९७ (५), यवतमाळ-१०५ (५), बुलढाणा-११८, वाशिम-९८, नागपूर-२८० (४), नागपूर मनपा-६३७ (२२), वर्धा-१३३, भंडारा-१३४ (२), गोंदिया-१३० (८), चंद्रपूर-१२०, चंद्रपूर मनपा-७८, गडचिरोली-५३, इतर राज्य-८ (३).

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा