Advertisement

अरे वा ! रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत कोरोनाचे ५१९ नवे रुग्ण

सोमवारी दिवसभरात ५०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण २ लाख ३७ हजार ०२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

अरे वा ! रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत कोरोनाचे ५१९ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव Coronavirus pandemic दिवसेंदिवस घट असताना, राज्यात सोमवारी कोरोनाने ६५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात ५१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात २० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण Recovery Rate मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २० रुग्ण दगावले आहेत. तर ७ आँक्टोंबर रोजी २३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ८ आँक्टोंबर रोजी एकूण २५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे ५१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ६५ हजार १४२ इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात ५०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण २ लाख ३७ हजार ०२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण?

सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवलं जात असल्याचंही मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविलं आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवलं जात आहे. सदर औषधाचं वितरण फक्त रूग्णालय व संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे.

हेही वाचा -'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान

आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती व छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे. प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक ०२२-२६५९२३६४ आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ हा उपलब्ध आहे. तरी रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविलं आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा