Advertisement

मुंबईत ५२१ नवे रुग्ण, राज्यात दिवसभरात ७०जणांचा मृत्यू


मुंबईत ५२१ नवे रुग्ण, राज्यात दिवसभरात ७०जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत मंगळवारी ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या केवळ ८८१२ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर ९३ टक्के रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

हेही वाचाः- संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले

मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असून रुग्ण वाढीचा दर ०.२१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ३३२ दिवसांवर गेला आहे. सध्या ८८१२ रुग्ण उपचाराधीन आहेत. दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ३,४४२ नवे रुग्ण आढळले असून ७० जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ७१,३५६ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ४,३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.: देशात गेल्या २४ तासांत २२ हजार ०६५ जणांना करोनाची लागण झाली असून बाधितांची एकूण संख्या ९९ लाख सहा हजार १६५ वर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्य़ांहून अधिक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक लाख ४३ हजार ७०९ वर पोहोचली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा