Advertisement

coronavirus : महाराष्ट्र दिनाची परेड रद्द

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

coronavirus : महाराष्ट्र दिनाची परेड रद्द
SHARES

राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. यामुळे १४ एप्रलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा लॉकडाऊन अधिक वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन जरी वाढला नाही तरी काही महिने आपल्याला खबरदारी म्हणून काही कठोर पावलं उचलावी लागतील. त्यापैकीच एक पाऊल मंत्रिमंडळाच्या बैठकीत उचलण्यात आलं आहे.


महाराष्ट्र दिनानिमित्त महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. एक मे रोजी महाराष्ट्र दिनाची परेड रद्द करण्यात आली आहे. याशिवाय १ मे रोजी राज्यभरात होणारे धव्जारोहण साधेपणानं करण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत. साधेपणानं जरी ध्वजारोहण करम्यात येणार असले तरी त्यात केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि निवडक मान्यवर उपस्थित असावेत, असे देखील आदेश आहेत.


३० टक्के वेतन कपात

कोरोनामुळे राज्यावर मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे, या आर्थिक संकटाशी मुकाबला करण्यासाठी देखील राज्य सरकारकडून (Maha vikas aghadi) विविध उपायोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील आमदारांसह इतर लाेकप्रतिनिधींच्या ३० टक्के वेतन कपातीचा (salary cut) निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ही वेतन कपात वर्षभरासाठी असून ती एप्रिल महिन्यापासूनच लागू होणार आहे.

आर्थिक परिणामांचा अभ्यास

राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणामांचा अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी दोन समित्यांची नेमणूक करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यातील पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल.


मुंबईत सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर जास्त वाढत आहे. सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतच आढळले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत अधिक भर पडली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत कोरोना पसरत आहे. कोरोनामुळे धारावीत आणखी एका महिलेचा मत्यू झाल्याचं समोर येत आहे. धारावीत आतापर्यंत हा तिसरा कोरोनाबळी आहे.


महिलेचा मृत्यू

गुरुवारी केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरात राहणारी होती. मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी Coronavirus चा हॉटस्पॉट ठरत आहे. धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे हा व्हायरस वेगानं पसरत असल्याची भिती वर्तवली जात आहे.



हेही वाचा

Exclusive: महाराष्ट्र सरकार शाळांना क्वारंटाईन सेंटर बनवण्याच्या विचारात

दाटीवाटीच्या परिसरात गर्दी पांगवण्यासाठी RPF ची मदत घेणार, राजेश टोपे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा