Advertisement

नवी मुंबईत पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबईत पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन
SHARES

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दोन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण काही निर्बंधांच्या अटीवर अनलॉक केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नवी मुंबई शहरात २९ तारखेपासून लॉकडाऊन लागू होणार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये ७ दिवसांचा लॉकडाऊन असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिसांची बैठक घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात घरोघरी मास स्क्रिनिंग होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका परिसरात गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वाढत्या प्राद्रुर्भावाचा आढावा घेऊन सद्यस्थिती काय आहे, महापालिका कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत, आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे कार्यान्वित होत आहेत आदी विषयां सदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी तपशीलवार माहिती घेतली.

दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं अगदी सुरुवातीपासूनच योग्य पावलं उचलली आहेत. टेलिफोनिक संवादाव्दारे ६ लाखाहून अधिक नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आरोग्यविषयक माहिती ऑनलाईन फॉर्मव्दारे संकलीत करण्यात आलेली आहे. नागरिकांसाठी ०२२ -२७५६७२६९ हा आरोग्य विषयक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यावर फोन केल्यास तज्ञ डॉक्टरांचा आरोग्य विषयक सल्ला उपलब्ध होत आहे.

याशिवाय महानगरपालिकेची २३ नागरी आरोग्य केंद्रे तसेच ४ रुग्णालये या ठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुरु करण्यात येऊन नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. कोव्हीड सदृष्य लक्षणं आढळल्यास महानगरपालिकेच्या चार रुग्णालयात स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू आहेत. तसंच कोरोना बाधीत मोठय़ा संख्येनं आढळले आहेत अशा विभागांमध्ये मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग करण्यात आलेले आहे.



हेही वाचा

कोपरखैरणे, तुर्भेमधील रुग्णवाढ चिंताजनक

MSEDCL Electricity Bill : ४ पट वीजबिलाचा नवी मुंबईकरांना 'शाॅक'

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा